22 November, 2024
जात वैधता प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम
हिंगोली (जिमाका), दि.22 : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात पडताळणीचे प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 28 नोव्हेंबर, 2024 पर्यंत विशेष त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राजू एडके यांनी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अभियांत्रिकी , वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी व बी.एड या व्यावसायिक आरक्षित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात अर्जदार स्तरावर जात प्रमाणपत्राची त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या अर्जदारांना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर सीसीआयव्हीएस-2 प्रणालीद्वारे त्रुटी कळविल्या आहेत. त्याची पूर्तता न केलेल्या अर्जदारांनी त्रुटी व मूळ कागदपत्रासह शिबीर कालावधीत दुपारी 12 ते 4 या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राजू एडके यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment