16 November, 2024
हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी, कर्मऱ्यांना प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी मतदान केंद्रावरील मतदान साहित्य वाटप, स्वीकृती करणे तसेच या कामाची सचोटी, कर्तव्य पारदर्शक व निःपक्षपातीपणे व बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले आहे.
या प्रशिक्षणास मतदान अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment