13 November, 2024
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरु
• जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र निश्चित
• प्रत्येक खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आर्द्रता तपासून घ्यावी
• 12 टक्के मॉइश्चरपेक्षा कमी आर्द्रता असलेला व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा
हिंगोली (जिमाका), दि. 13 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, या खरेदी केंद्रावर खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु झाली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 7 जानेवारी, 2025 पर्यंत मूग व उडीद खरेदी तर दि. 12 जानेवारी, 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे.
मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्रावर केंद्र चालक म्हणून मारोती शिवदास कदम (संपर्क 9736449393) तर कळमनुरी येथील केंद्रावर प्रशांत तुकाराम मस्के (9921609393) हे आहेत.
हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून शेख गफार शेख अली हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881501040 असा आहे. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र बळसोंड जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून नारायण शामराव भिसे हे कामकाज पाहणार असून, 9850792784 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कृष्णा नामदेव हरणे हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9175586758 असा आहे. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल जयाजीराव काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्र. 8007386143 आहे.
विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर वैजनाथ माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश रावजीराव पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सागर प्रभाकर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे. गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे आहे. केंद्र चालक कैलास सुभाष ढोकणे हे आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7447758312 असा आहे.
प्रत्येक खरेदी केंद्रामार्फत आर्द्रतामापक यंत्र घेऊन नजीकच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये अथवा ज्या ठिकाणी शेतकरी जास्त आहेत, त्या ठिकाणी सोयाबीनची आर्द्रता तपासून घ्यावी. आर्द्रता जास्त असेल तर ते 12 टक्के मॉईश्चरपर्यंत कसे आणावे याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे मॉइश्चर 12 टक्क्यापर्यंत आहे, त्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेंतर्गत खरेदीकरिता केंद्रामध्ये घेऊन जाऊन नाव नोंदणी करावी व खरेदीबाबत सहकार्य करावे. खरेदी केंद्रामार्फत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक एसएमएस देऊन सोयाबीनची आर्द्रता व खरेदीबाबत माहिती द्यावी. एफएक्यू नॉर्मस बाबत तसेच आर्द्रतेच्या प्रमाणाबाबतचे बॅनर आपले कार्यालय, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय, सर्व जिल्हा कृषी विभाग कार्यालये, स्थानिक पंचायत समिती, सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, तलाठी कार्यालय, तहसीलदार व गटविकास अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावावे. पॉम्पलेट तयार करुन त्याबाबत प्रसिध्दी करावी. खरेदी केंद्रामार्फत सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्के पर्यंत असावे, असे आवाहन करण्याच्या सूचना जिल्हा पणन अधिकारी यांनी केल्या आहेत.
शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आर्द्रता असलेला व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment