07 November, 2024
ईव्हीएम मशीनची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया आज राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि 07 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उद्या शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली यांच्यामार्फत विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची द्वितीयस्तरीय सरमिसळ (Second Randomization) जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी उद्या शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment