13 November, 2024

विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज घेणार निवडणूक कामाचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 13 : भारत निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली असून, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. तर बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उद्या गुरुवार, दि. 14 नोव्हेंबर, 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे निवडणूकविषयक विविध कामकाजाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. *******

No comments: