11 November, 2024

निवडणूक खर्चाची द्वितीय लेखे तपासणी आज

उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा अचूक हिशेब ठेवावा हिंगोली (जिमाका), दि 11 : हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान यांच्या उपस्थितीत द्वितीय निवडणूक खर्च लेखे तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली या तिन्ही विधानसभा मतदार संघातील अंतिम झालेले सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी उद्या मंगळवार रोजी द्वितीय लेखे तपासणीसाठी खर्चाच्या दैनंदिन हिशोबाची नोंदवही व खर्चाच्या प्रमाणकासह प्रत्यक्ष उपस्थित राहून ही तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी दिगंबर माडे यांनी खर्च सनियंत्रण कक्षातर्फे केले आहे. या लेखे तपासणीसाठी अनुपस्थित राहणाऱ्याविरुद्ध निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील बाब क्र. 77 (1) मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच निवडणूक खर्चाची तृतीय लेखे तपासणी दि. 18 नोव्हेंबर रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. *******

No comments: