10 November, 2024
जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी प्रसिध्द
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचारसंहित दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघांतील मतदान केंद्राची यादी प्रसिध्द झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 92-वसमत, 93- कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने, मतदान क्षेत्रासाठी किंवा प्रत्येकाच्या समोर नोंदविलेल्या मतदारांच्या गटासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले आहे. यामध्ये मतदान केंद्राचे ठिकाण, परिसर, मतदान केंद्राची इमारत, मतदान केंद्राच्या व्याप्तीनुसार मतदान क्षेत्र याची सर्व माहिती या यादीमध्ये नमूद आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 327 मतदान केंद्र असून, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 345 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 अशा एकूण 1015 मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्यात आली असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment