09 November, 2024

शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र परिसरात 163 कलम लागू

हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्हास्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा-2024 (TET) चे उद्या, रविवार, दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 व दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या दरम्यान दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील परीक्षा केंद्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत 1) पोतदार इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल जवळा पळशीरोड हिंगोली, 2) सरजुदेवी भारुका आर्यकन्या विद्यालय हिंगोली, 3) अनुसया विद्यामंदीर खटकाळी परिसर हिंगोली, 4) आदर्श महाविद्यालय हिंगोली इमारत भाग- 1 व 2, 5) शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल हिंगोली आणि 6) विद्या निकेतन इंग्लीश स्कूल हिंगोली या परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत 1) पोतदार इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल जवळा पळशीरोड हिंगोली, 2) सरजुदेवी भारुका आर्यकन्या विद्यालय हिंगोली, 3) अनुसया विद्यामंदीर खटकाळी परिसर हिंगोली, 4) आदर्श महाविद्यालय हिंगोली इमारत भाग-1 व 2, 5) शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल हिंगोली, 6) विद्या निकेतन इंग्लीश स्कूल हिंगोली व 7) सॅकरेड हार्ट इंग्लीश स्कूल हिंगोली या परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सकाळी व दुपारी परीक्षा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील. परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना लागू राहणार नाही. परीक्षार्थींना केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट वॉचेस, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल. या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. *****

No comments: