11 November, 2024

सूक्ष्म निरीक्षकांना मतदान प्रक्रियेबाबत दिले प्रशिक्षण

• प्रशिक्षणात दिली कामाची माहिती हिंगोली (जिमाका), दि. 11 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांना (Micro Observer) निवडणुकीत करावयाच्या कामाबाबतचे प्रथम प्रशिक्षण आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये पीपीटीद्वारे सूक्ष्म निरीक्षकाचे कार्य, मतदान सुरू होण्यापूर्वी करावयाची कामे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु असताना करावयाची कामे, परिशिष्ट-28 सूक्ष्म निरीक्षकांच्या अहवालाचे स्वरूप, मतदान केंद्रावरील तयारीचे निरीक्षण करणे, मॉक पोल निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पार पाडले जात आहे का, याची पाहणी करणे, मॉक पोल नंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी CU मधील मते clear झाली आहेत का? तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया व इतर बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना सूक्ष्म निरीक्षकांचे कार्याचे मॅन्युअलही देण्यात आले. यावेळी कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) ची जोडणी, मशीन सिलिंग प्रक्रिया व हाताळणी यांचे प्रात्यक्षिकही दाखविण्ययात आले. तसेच यावेळी सूक्ष्म निरीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले. तर प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी दीपक साबळे यांनी निवडणुकीचे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याच्या सूचना देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला. ******

No comments: