02 September, 2016

सार्वजनिक ग्रंथालयासाठी कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, दि. 2 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाताअंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेतून ग्रंथालयांसाठी राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्याच्या विविध योजनांची व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सार्वजनिक ग्रंथालयांना माहिती देण्यासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे . सदर कार्यशाळा दिनांक 7 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 9-00 ते दुपारी 4-00 या वेळेत कल्याण मंडपम् , नगर परिषद, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदरील कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. मा. गाडेकर, विशेष अतिथी म्हणून क्षेत्रिय अधिकारी (पश्चिम विभाग) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे अनंत वाघ , जिल्हा कोषागार अधिकारी टि. एल. भिसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु.सं. हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक आदी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष धों. साबळे यांनी कळविले आहे.

**** 

01 September, 2016

 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळाना 
सार्वजनिक गणेशोत्सव  अभियान स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 01 :-   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या " स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यावर्षी  "लोकमान्य  गणेशोत्सव अभियान"  व                         "लोकमान्य उत्सव" राबविण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत स्वदेशी, साक्षरता, बटी बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयावरील कल्पनेशी निगडीत देखाव्याची स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता हिंगोली तालुक्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळानी सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक 5 सप्टेंबर, 2016 पुर्वी विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ज्या गणेश मंडळांनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे नोंदणी  केली आहे. अशा गणेश मंडळाची पाहणी तालुकास्तरीय पथकाकडून करण्यात येईल व तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय , तृतीय असे क्रमांक निवडले जातील. सदरील निवडीसाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पारितोषिक 15 हजार व तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये अशी रोख रक्कम देण्यात येणार आहे.
ज्या गणेश मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे. त्यांनी दिनांक 5 सप्टेंबर,, 2016 रोजीपूर्वी विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावेत.

***** 
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

हिंगोली, दि. 01 :-  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 29 ऑगस्ट, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 12 सप्टेंबर, 2016 रात्रीच्या 24 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दि. 01 सप्टेंबर, 2016 पोळा, दि. 04 सप्टेंबर, 2016 रोजी हरितालीका तसेच दि. 05 सप्टेंबर, 2016 रोजी गणेश चतुर्थी, व दि. 12 सप्टेंबर, 2016 रोजी बकरी ईद असे सन व उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच हिंगोली जिल्हयात व राज्यात घडत असलेल्या घटनांच्या अनुषंगाने   राजकीय घडामोडी वक्तव्ये व येथील राजकीय पक्ष शाखा यांचेकडून जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटना यांचेकडून आपल्या मागण्या करीता धरणे, मोर्चे, रास्तारोको, आमरण उपोषणे, बंद, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सारखे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 29 ऑगस्ट, 2016 रोजीचे 6.00 वा. पासुन ते 12 सप्टेंबर, 2016 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
                                                            **** 


फिरते लोकन्यायालयाचे 6 ते 29 सप्टेंबर कालावधीमध्ये आयोजन
हिंगोली, दि.01: मा. उच्च न्यायालय, विधी देखरेख उपसमिती, औरंगाबाद यांचे आदेशानुसार परभणी न्यायीक जिल्ह्यामध्ये दि. 6 ते दि.9 सप्टेंबर, 2016 या कालावधीमध्ये फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, परभणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिरांचे वाहन जिल्हा न्यायालय, परभणी येथे येणार असुन त्याचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
त्यानंतर सर्व प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रलंबीत प्रकरणे तडजोडीद्वारे मिटविण्यासाठी फिरते लोक न्यायालयाचे आयोजन परभणी जिल्हा न्यायालय परिसरात करण्यात आले आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यामधील तालुक्याअतंर्गत असलेल्या गावी  फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण, परभणीचे सदस्य सचिव  सुधाकर एन. सोनवणे यांनी कळविले आहे.
****






कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षणासाठी
लाभार्थी/उमेदवारांचे नामांकन करण्याबाबत
हिंगोली, दि. 1 :-  राष्ट्रीय महामंडळ सामाजिक न्याय व अधिकरिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत हस्तकला, वस्त्रोद्योग , हातमाग व कुशल कारागीर यांच्या संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत राष्ट्रीय महामंडळाकडून प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवरांची माहिती मागविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील इच्छूक उमेदवरांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपले संपूर्ण नाव , पत्ता, वय, कर्ज योजनांसाठी अर्ज केला आहे काय ? कर्ज मंजूर स्थिती अशा नमुन्यात माहिती वीस दिवसात सादर करावीत. प्रशिक्षणाबाबत इच्छूक उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानंतर सामाजिक न्याय व अधिकारिता , मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत कळविले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित आणि विकास महामंडळ मर्या. प्रशासकीय भवन , 4 मजला, राकृष्ण चेंबुरकर मार्ग, मुंबई-40071 , दुरध्वनी क्रमांक 25599685 , फॅक्स क्रमांक 022-25229219 , www.msobcfdc.gov.in , ई-मेल msdmsobcfdc@gmail.com संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित आणि विकास महामंडळ मर्या. चे व्यवस्थापकीय संचालक यांनी कळविले आहे.
****



शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
 हिंगोली, दि. 1 :-  सन 2016-2017 या शैक्षणिक वर्षाकरिता समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरणे व नुतणीकरण करणे याकरिता समाज कल्याण विभागाची वेबसाईट                                                         www.mahaeschol.maharashtra.gov.in सुरु झाली असून हिंगोली जिल्ह्यातून सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना सुचना द्याव्यात .
तरी सन 2016-2017 करिता हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क या योजनेकरिता ऑनालाईन अर्ज न भरल्यामुळे किंवा संबंधित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्नीत नसल्यामुळे सदर योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याकरिता व्यक्तीश: संबंधित विद्यार्थी तसचे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. तसेच महाविद्यालयातील मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज नुतणीकरण न केल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी सदर योजनांच्या लाभापासून वचिंत राहिल्यास त्या महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. याची जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण , हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

**** 
 प्रशिक्षण योजनेसाठी विविध संस्थांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 1 :-  महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजातील कुटूंबामधील पात्र मुला / मुलींसाठी प्रशिक्षण योजना ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी खालील अटी पूर्ण करीत असलेल्या संस्थांकडून प्रशिक्षण देण्याकरिता या जाहिरातीद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.  
संस्थेस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई -400001 , महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई -51 / व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ , मुंबई-51 यांच्याकडून मान्यता अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. सदर संस्था मागील सलग पाच वर्षापासून कार्यरत असावी. संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. सदर संस्थेकडून मगील तीन वर्षाचे ऑडिट ट्रेडनिहाय प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिलेले आहे, याचा तपशिल देण्यात यावा . सदर संस्थेमार्फत मागील तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती प्रशिक्षाणार्थींनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे / नोकरी मिळाली आहे. याचा तपशिल देण्यात यावा. सदर संस्थेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षार्थींपैकी 30 टक्के महिला प्रशिक्षणार्थी असणे आवश्यक आहे. सदर संस्थेस शासन मान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थांची प्रशिक्षणासाठी मान्यता असल्याबाबतचा सविस्तर तपशिल देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सदर ट्रेडची परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशिल देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरिता आपणांकडून काय कार्यवाही करण्यात येते व स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी कोणती मदत प्रशिक्षार्थीस करण्यात येते . याकरिता आपणांकडे कोणती यंत्रणा कार्यरत आहे. याचा तपशिल देण्यात यावा. बाहेरगावच्या प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकेल काय ?  याबाबतचा तपशिल सादर करावा.
वरील अटींची पुर्तता करीत असलेल्या प्रशिक्षण संस्थांनी दिनांक 5 सप्टेंबर, 2016 ते 13 सप्टेंबर, 2016 या कालावधीमध्ये प्रस्ताव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय या ठिकाणी सादर करावा. तसेच प्राप्त झालेल्या संस्थेच्या प्रस्तावाची स्थळ पाहणी दिनांक 15 सप्टेंबर, 2016 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक करुन व त्याचा अहवाल प्रधान कार्यालय, मुंबई येथे सादर करतील, असे जिल्हा व्यवस्थापक हि. द. गतखणे (अ.का.) यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****