30 December, 2017

विधानसभा अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा



वृत्त क्र.589                                                                           दिनांक : 30 डिसेंबर 2017
विधानसभा अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.30:- विधानसभा अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – सोमवार ,दिनांक  1 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव , सकाळी 11.30 वाजता रिसाला बाजार येथील शोरुमच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती , दुपारी 2.00 वाजता रामलिला मैदान येथील  तुलसी रामायण  कथा या कार्यक्रमास उपस्थिती , दुपारी 3.00 वाजता  मोटारने रामलिला मैदान येथून शासकीय विश्रामगृह  जालनाकडे प्रयाण.
0000

28 December, 2017

महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन



वृत्त क्र.588                                                                           दिनांक : 28 डिसेंबर 2017

महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.28:- सन 2016-17 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारत  सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण  शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेसाठी  अर्ज  भरले होते त्यापैकी कार्यालय स्तरावरील सर्व अर्ज निकाली काढून संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे . तरी पण आजस्थितीत जुन्या शिष्यवृत्ती पोर्टलवर  काही विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या  स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर अर्ज  निकाली  काढणे शक्य  नाही. महाविद्यालयनिहाय  प्रलंबित अर्जाबाबत  समाज कल्याण  विभागामार्फत  महाविद्यालयांच्या ई मेल आयडी वर पत्र पाठवून  यापूर्वी  कळविण्यात  आले आहे .  तरी संबंधित  महाविद्यालयाने आपल्यास्तरावर असलेले प्रलंबित  अर्ज समाज कल्याण विभागास  आवश्यक असलेल्या  कागदपत्रांसह  सादर करुन व ऑनलाईनद्वारे  समाज कल्याण विभागाकडे दि. 5 जानेवारी 2018 पर्यंत  सादर करावेत जेणेकरुन समाज कल्याण विभागास  सदर अर्जाची  तपासणी करुन पात्र अर्ज निकाली काढणे  सोयीचे  होईल. जुने  शिष्यवृत्ती पोर्टल सिमीत  कालावधीसाठीच सुरु  असल्याने दि. 5 जानेवारी 2018 पर्यंत  महाविद्यालयाकडून समाज कल्याण विभागास  आवश्यक  कागदपत्रांसह  प्रलंबित  अर्जांच्या मूळ प्रती व बी स्टेटमेंट सादर न केल्यास  तसेच ऑनलाईन प्रक्रियेद्वारे  सुध्दा समाज  कल्याण  विभागास  अर्ज सादर  न केल्यास  महाविद्यालयस्तरावर राहीलेले प्रलंबित  अर्ज निकाली  काढता येणार नाही . येईल  त्यामुळे  जिल्ह्यातील  पात्र  मागासवर्गीय  विद्यार्थी  लाभापासून वंचित  राहिल्यास  त्याची सर्व जबाबदारी  संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यांची राहील याबाबत  जिल्ह्यातील  सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी , असे  आवाहन सहायक आयुक्त , समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे .
0000

27 December, 2017

वेतन पडताळणी पथकाचा दौरा



वृत्त क्र.587                                                  वेतन पडताळणी पथकाचा दौरा
हिंगोली,दि.27 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2018 चा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 4 जानेवारी 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व 5 व 6 जानेवारी 2018 रोजी जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे वेतन पडताळणी पथक या कालावधीत  येथील कोषागार कार्यालयात  उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
0000000

रब्बी हंगाम 2017-18 करीता पिक संरक्षणात्मक पाणी पाळीसाठी पाणी अर्ज मागविण्याबाबत जाहीर निवेदन



वृत्त क्र.586                                                                           दिनांक : 27 डिसेंबर 2017
रब्बी हंगाम 2017-18 करीता पिक संरक्षणात्मक पाणी पाळीसाठी
पाणी अर्ज मागविण्याबाबत जाहीर निवेदन
        हिंगोली, दि.27:- उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा  कि.मी.119 व इसापूर डावा कालवा कि.मी.84 पर्यंतच्या वितरण  व्यवस्थेअंतर्गत लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना कळविण्यात येते की, सिंचन वर्ष 2017-18 मध्ये इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाच्या प्रारंभी धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या  लाभक्षेत्रात रब्बी हंगामाकरिता सिंचन कार्यक्रम पुर्णपणे राबविणे शक्य होणार नाही . सद्य:स्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील उभी हंगामी व बारमाही पिकांना संरक्षणात्मक एक पाणी पाळी डिसेंबर 2017 अखेर देण्याचे प्रस्तावित आहे.त्यानुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांना कळविण्यात येते की, नमुना 7 व 7 अ मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत . खालील दर्शविलेल्या शर्तीस व शासनाच्या प्रचलित अनुसरुन पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल. हंगामाची मुदत दिनांक 15 ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018, पिकाचे नाव –उभ्या पिकांना संरक्षणात्मक पाणी पाळी , पाणी अर्जाचा विहित नमुना क्र. 7 व 7 अ संबंधित शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल , सदर पाणी अर्जात पिकाची  मागण 20 आर च्या पटीत  नोंदवावी , अर्जातील  पूर्ण माहिती भरुन पाणी अर्ज  कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात  दाखल  करुन त्याची  पोच पावती घ्यावी , पाणी अर्ज  भरतेवेळेस थकबाकीदार  लाभधारकांनी  मागील  थकबाकी व चालू पिकांची अग्रीम पाणीपट्टी  भरुन सहकार्य करावे म्हणले दिलेला पाणी अर्ज  मंजूर होईल , नियमानुसार  पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर  होईल  तेव्हा  नामंजूर  क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा  करणे बंधनकारक  राहणार नाही ,  मंजूर  क्षेत्रासच कालव्याचे पाणी अग्रक्रमाणे देण्यात येईल, नामंजूर व अनधिकृत क्षेत्रास  कालव्याचे  पाणी देण्याची जबाबदारी  पाटबंधारे  विभागावर राहणार नाही तेव्हा  कृपया मंजूरी  घेऊनच  पिकांचे नियोजन करावे ,  उडाप्याचे  व वितरिका, मायनरच्या टेलच्या भागातील क्षेत्रास  परवानगी  दिली जाणार नाही ,  तेव्हा कालव्याच्या  पाण्यावर  विसंबून  पिके घेऊ नयेत , याची नोंद  घ्यावी व या व्यतिरिक्त  टेलच्या भागात  पिके घेतल्यास  व पाण्याअभावी  पिके वाळल्यास  त्यास पाटबंधारे  विभाग जबाबदार राहणार नाही ,  प्रत्येक  लाभधारकांनी  ठरवून दिलेल्या  तारखेप्रमाणेच पिकास पाणी घ्यावे , तसेच दिवसरात्र पाणी घेणे  बंधनकारक  आहे , दिवसा किंवा रात्री जेव्हा पाणी पाळी येईल तेव्हा पाणी घेतले नाहीतर  नदी / नाल्यास  पाणी वाया  जाते त्यामुळे  सिंचनाचा  कालावधी  वाढतो पर्यायाने पाणी पाळी  अंतरात वाढ होते . त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास ठराविक  मुदतीत पाणी देणे  शक्य होणार नाही व त्याचे जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही . याची सर्व लाभधारकांनी  गांर्भियाने नोंद घ्यावी , सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा , कमी पाण्यात व कमी वेळात  सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा , पाणी नाश कटाक्षाने टाळावा , नैसर्गिक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव  पाणी पुरवठा  करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास  त्याची जबाबदारी  पाटबंधारे  विभागावर  राहणार नाही  तसेच महाराष्ट्र पाटबंधारे  प्रचलित नियमानुसार शर्ती व अटीचे  उल्लंघन झाल्यास लाभधारकास आगाऊ सूचना  न देता दिलेली मंजुरी रद्द  करण्यात येईल व पाणी पुरवठा बंद करण्यात येईल , सिंचन नियमांचे पालन करणे प्रत्येक लाभधारकास बंधन कारक राहील, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, पाणी वापर संस्थांनी पाणी पाळीतच संस्थेचे क्षेत्र भिजवून घ्यावे , असे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 , नांदेड यांनी कळविले आहे.
000000

26 December, 2017

जिल्ह्यात राष्टीयकृत व खाजगी बँकामार्फत आधार नोंदणी केंद्र सुरु



वृत्त क्र.585                                              
जिल्ह्यात राष्टीयकृत व खाजगी बँकामार्फत आधार नोंदणी केंद्र सुरु
        हिंगोली, दि.26:- जिल्ह्यातील सिंडीकेट बँक , एच.पी. गॅस एजन्सीजवळ, नारायण नगर   येथे 1 ऑक्टोबर 2017 पासून आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे, आधार नोंदणीची वेळ सकाळी 10.00 ते 4.00 पर्यंत  संपर्क क्रमांक 02456-220049 आणि आय.सी.आय.सी.आय. बँक, चेदीया  कॉम्प्लेक्स , नवा मोंढा  येथे दिनांक 2 डिसेंबर पासून आधार नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले असून वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 पर्यंत संपर्कासाठी क्रमांक 7410071313 आहे .
                तसेच नंतर महाराष्ट्र बँकेचे(हिंगोली येथे)- 1 आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक,  वसमत, औंढा ना. कळमनुरी , अकोला रोड हिंगोली येथे  4 असे  एकूण 5 आधार नोंदणी  केंद्र लवकरच जानेवारी / फेब्रुवारी 2018 पर्यंत सुरु होत आहेत.
                तरी जिल्ह्यातील नागरीकांनी आपले आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी वरील आधार नोंदणी  केंद्रावर संपर्क साधावा , असे आवाहन अग्रणी बँक व्यवस्थापक , हिंगोली यांनी केले आहे.
000000