23 March, 2018

कोषागार आणि उपकोषागार कार्यालय 31 मार्च रोजी


कोषागार आणि उपकोषागार कार्यालय 31 मार्च रोजी
रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु राहणार

            हिंगोली,दि.23: महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील  नियम क्रमांक 409 अन्वये  प्राप्त  प्राधिकारानुसार दिनांक 31 मार्च 2018 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार  पूर्ण करण्याच्या  दृष्टीने  सदर दिवशी  स्टेट बँक ऑफ इंडिया  यांच्या शाखा हिंगोली , वसमत , कळमनुरी , सेनगाव व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा ना. आणि जिल्हा कोषागार कार्यालय , हिंगोली  तसेच बँकींग  उपकोषागारे  वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा ना. दिनांक 31 मार्च 2018 रोजी उशिरापर्यंत रात्री 23.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी कळविले आहे .
00000

पालकमंत्री मा.ना.श्री.दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री मा.ना.श्री.दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
            हिंगोली,दि.23: सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय्य , मदत व पुनर्वसन , भूकंप पुनर्वसन , अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .
            दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता लिंबाळा तांडा ता. सेनगांव येथे आगमन व इजिमा  22 ते लिंबाळा  आमदरी  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 12.15 वाजता  वाहनाने कापडसिंगी मार्गे बर्डा ता. सेनगावकडे प्रयाण, दुपारी 01.00 वाजता  महादेव मंदिर बर्डा येथे आगमन  व कापडसिंगी  ते बन रोडच्या  कामाचे भूमिपूजन तसेच राज्य रस्ता 227 ते पिंप्री  बर्डा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 01.30 वाजता वाहनाने कापडसिंगी ता. सेनगांवकडे प्रयाण , दुपारी 01.45 वाजता कापडसिंगी ता. सेनगाव येथे आगमन व राखीव,  दुपारी 02.15 वाजता वाहनाने भानखेडा – कवठा मार्गे जयपूर ता. सेनगावकडे प्रयाण , दुपारी 2.45 वाजता  जयपूर ता. सेनगाव येथे आगमन व जयपूर ते वेलतुरा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 03.15 वाजता वाहनाने वेलतुरा  ता. सेनगाव कडे प्रयाण , दुपारी 3.30 वाजता  वेलतुरा ता. सेनगाव येथे आगमन  व रस्त्याचे भूमिपूजन , दुपारी 03.45 वाजता वाहनाने कोळसा  ता. सेनगाव कडे प्रयाण ,  दुपारी 04.00 वाजता  कोळसा ता. सेनगाव  येथे आगमन  व कोळसा  132 केव्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा , सायं. 05.00 वाजता  वाहनाने सेनगाव कडे प्रयाण , सायं.05.15 वाजता  सेनगाव येथे आगमन  , सायं.06.00 वाजता सेनगाव येथून वाहनाने मकोडी कडे प्रयाण , सायं. 06.30 वाजता  मकोडी ता. सेनगाव  येथे आगमन  व रस्त्याचे  भूमिपूजन , रात्री 08.00 वाजता वाहनाने येलदरी-जिंतूर –जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण .
00000



21 March, 2018

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा सादर करणेकरीता मुदतवाढ


           जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणी

पुरवठा करण्यासाठी निविदा सादर करणेकरीता मुदतवाढ


            हिंगोली,दि.21: जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी भागातील टंचाईग्रस्त गाव/वाड्या/तांड्यांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेकरीता यापुर्वी ई-निविदा सादर करणेबाबत प्रसिध्दी करण्यात आली होती. परंतू त्यानुसार अद्यापपर्यंत एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने सदर कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी 12 वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर निविदा या http://mahatenders.gov.inwww.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छूकांनी सदर कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी 12 वाजेपर्यंत आपल्या ई-निविदा सादर कराव्यात असे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.  

20 March, 2018

हिंगोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन


हिंगोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
            हिंगोली, दि.20: जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने दि. 21 व 22 मार्च 2018 रोजी  11:00 वाजता  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत एस- 3 तिसरा माळा, जिल्हाधिकरी कार्यालय परीसर, हिंगोली  येथे Sales Representative, Operator, Trainee, Trainee Appreciate या पदांसाठी  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आला असून खालील उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.                   
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
अ.क्र.
उद्योजकांची नाव
पदांचे नाव
पदसंख्या
शैक्षणिक पात्रता
वेतन
1
नवभारत फर्टीलायजर लीमीटेड
Sales Representative
40
12 वी पास
10,000 ते 12,000
2
रेमण्ड कॉटन्स लिमीटेड, अमरावती
Operator
50
ITI दोन वर्षाचा
5,700 व उपस्थिती भत्ता
3
धूत ट्रान्समिशन प्रा.लि. औरंगाबाद.
Trainee
100
12 वी पास

7,500 ते 9,000
Trainee Appreciate
50
ITI
            
            रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी mahaswayam.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावे/पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अप्लाय सदर कार्यालयात दि. 21 मार्च रोजी वेळ 11.00 ते 2.00 यादरम्यान करुन देण्यात येईल.अधिक माहितीसाठी या mahaswayam.in वेबपोर्टलला भेट द्या किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी 02456 -224574 वर संपर्क साधावा. वरील शैक्षणिक पात्रताधारक शिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, सेवायोजन कार्ड घेवून दिलेल्या पत्यावर स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, हिंगोली, यांनी केले आहे.
000000

16 March, 2018






 लघुपाटबंधारे विभाग , हिंगोली  यांच्यावतीने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारे यांच्या हस्ते शुक्रवार 16 मार्च 2018 रोजी  नद्याच्या पाण्याच्या कलश पुजनाने जिल्हा नियोजन समिती सभागृह , हिंगोली येथे करण्यात आले . त्या कार्यक्रमाचे छायाचित्र...

15 March, 2018

आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन चव्हाण यांना आमदार निधीतून रायफलचे वितरण


आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन चव्हाण यांना
                  आमदार निधीतून रायफलचे वितरण
            हिंगोली,दि.15: सेनगाव तालूक्यातील हत्ता (नाईक) या गावातील आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन आत्माराव चव्हाण यांना आमदार तान्हाजी मुटकूळे यांच्यास आमदार निधीतून रायफलचे आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
            यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. पवार जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सहायक नियोजन अधिकारी श्री. आव्हाड यांची उपस्थिती होती.
            नेमबाज चव्हाण यांनी 10 मीटर एअर रायफल आणि 50 मीटर पॉईंट टू-टू रायफल या प्रकारात आंरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सन 2012 ते 2016 सलग 4 वर्ष त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 7 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेवून 4 सुवर्ण तर 7 रौप्य आणि 1 कांस्य पदक  मिळविण्याची कामगिरी केली आहे. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत्‍ 3 सुवर्ण तर 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकाची कामगिरी केली आहे.
00000

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांसाठी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना


जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृदसंधारणाच्या
कामांसाठी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना
        हिंगोली,दि.15: राज्यातील  जलयुक्त शिवार अभियान/जल व मृद  संधारणाची कामे करण्यासाठी  जलसमृध्दी  यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय योजना  सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य  शासनाने  दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी घेतला आहे.  या निर्णयान्वये  राज्यात जलयुक्त  शिवार  अभियान / जल व मृद  संधारणाची  कामे करण्यासाठी  सुशिक्षित  बेरोजगार  तरुण / शेतकरी उत्पादक  संस्था/ नोंदणीकृत  शेतकरी गटास / सुशिक्षित  बेरोजगारांच्या  सहकारी संस्था  विविध कार्यकारी  सहकारी  संस्था यांना  आवश्यक ते प्रशिक्षण  देऊन त्यांना उत्खनन  यंत्रसामुग्री खरेदी  करण्यासाठी  वित्तीय  संस्थांकडून कमाल कर्ज  मर्यादा  रुपये 17.60 लाख उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील  5 वर्षांच्या 5.90 लाख रुपये  व्याजाचे  दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे.
            या योजनेसाठी हिंगोली  जिल्ह्यात  एकूण 241 अर्ज प्राप्त  झाले होते . महाराष्ट्र शासन  मृद व जलसंधारण  विभागाचे शासन निर्णय  दिनांक 5 मार्च 2018 अन्वये  दिलेल्या  निकषा प्रमाणे  प्रथम टप्प्यामध्ये या योजनेत  प्राप्त 241 अर्जाची समिती मार्फत  छाननी  करुन 143 अर्जदारांची  शिफारस  करण्यात आली होती . या शिफारस केल्यापैकी 120 सुशिक्षित  बेरोजगार  अर्जदाराची यादी महाऑन  लाईनवर  प्रसिध्द  करण्यात आली आहे . सदरील यादी जिल्हा  उपनिबंधक , सहकारी संस्था , हिंगोली  कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे . हिंगोली जिल्ह्यासाठी 50 लाभार्थी  निवडीचे  उद्दिष्ट दिलेले आहे . सदर योजनेसाठी  सध्या नोटीस  बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या अर्जांच्या बाबतीत  दिनांक 5 मार्च 2018 च्या शासन  निर्णयातील  निकषाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे .
            पात्र अर्जदारांनी  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील  अधिकृत  परवानाधारक  असलेल्या जिल्ह्यातील  वित्तीय  संस्थेकडून  सदर योजनेअंतर्गत  शासन निर्णयाप्रमाणे  विनाअट  कर्ज मंजुरीचे  पत्र आपल्या  लॉग इन  आयडीद्वारे  दिनांक 23 मार्च 2018 पर्यंत  ऑनलाईन  सादर करावे , कर्ज  मंजुरी पत्रामध्ये  शासनाचे दायित्व , शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या  व्याजाच्या परताव्याच्या रक्कमेकरीता कर्जाच्या रकमेची  कमाल मर्यादा रु. 17.60 लाख राहील  व त्यानुसार  5 वर्षांमध्ये  शासनामार्फत  कमाल व्याज  परतावा रक्कम रु. 5.90 लक्ष पर्यंत  राहील , अशी अट वित्तीय संस्थेस मान्य असल्याचे  स्पष्ट नमूद असावे , ज्यांनी  बँकेचे  पत्र अपलोड  केले आहेत त्यांची समितीमार्फत  छाननी नंतर जिल्ह्यातील  लक्षांकापेक्षा अधिक अर्जदारांनी  वित्तीय संस्थेचा  कर्ज मंजुरीचा  दाखला  सादर केल्यास  जिल्हास्तरीय  समितीद्वारे जाहीर सोडत काढून लॉटरी पध्दतीने  लाभार्थी  निवड होईल असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे .
00000

वृत्त क्र.75                                                                              
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी मुदतवाढ
        हिंगांली,दि.15:राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  या पदासाठी  दिनांक 13 मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात  आले होते . परंतू या पदासाठी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . तरी www.nyks.org  या संकेतस्थळावर जाऊन माहिती अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर यांनी केले आहे .
00000