हिंगोली, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रात उपलब्ध असलेल्या चारा व गवताचा आढावा घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्याचे मुख्य सचिव यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी चारा टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार वनविभागाच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या चारा व गवताचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घ्यावा. पशुधनासाठी उपलब्ध करून देता येऊ शकणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण निश्चित करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, अशाही जिल्हाधिकारी यांनी विभागीय वनाधिकारी यांना सूचना केल्या आहेत.
No comments:
Post a Comment