01 August, 2024
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 11 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 15.20 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वात कमी 4.10 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 4.10 (484.70), कळमनुरी 12.80 (453.30), वसमत 15.20 (403), औंढा नागनाथ 14.80 (406.30) आणि सेनगाव तालुक्यात 8.10 (418.50) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 1 ऑगस्ट, 2024 पर्यंत सरासरी 435.30 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 54.73 अशी आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment