02 August, 2024
जिल्ह्यात हिपॅटायटीस जनजागृती रॅलीला सुरुवात
हिंगोली (जिमाका), दि. 02 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमास राज्यात सर्वत्र प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत हिपॅटायटीस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. हिपॅटायटीस या आजाराबददल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने "It's time for action यावर्षी हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त दि. 22 जुलै ते 3 ऑगस्ट, 2024 या दरम्यान पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिपॅटायटीस पंधरवाडा दिनानिमित्त दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 90 प्रशिक्षणार्थीची व अधिकारी कर्मचारी यांची हिपॅटायटीस बी व सी चे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये शासकीय नर्सिंग कॉलेजच्या सर्व प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला आहे.
या रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हिरवी झेंडी सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दिपक मोरे, श्री. चिंचकर (मेट्रन), श्रीमती आशा क्षीरसागर (सहाय्यक मेट्रन), नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य कुलदिपक कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, श्री. सोळंके उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण गाभणे, व्ही. एस.आंबटवार, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारीका यांनी परिश्रम घेतले.
हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी रक्त्त तपासणी करावी व या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment