03 August, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुट्टीच्या दिवशीही मदत कक्ष सुरू

हिंगोली (जिमाका), दि. ३ : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांची कुटुंबातील निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तालुका कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशीही तालुका कक्ष सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सर्व तालुका सनियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. *****

No comments: