01 August, 2024

जवाहर नवोदय विद्यालयात 6 वीच्या प्रवेशासाठी 16 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

• 18 जानेवारीला हिंगोली जिल्ह्यातील नियोजित केंद्रावर होणार प्रवेश परीक्षा हिंगोली (जिमाका), दि. 01 : वसमत येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी इयता 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यांत येत आहेत. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. प्रवेश परीक्षा अर्ज करण्यांची प्रकिया सुरु झाली असून अर्ज करण्यांची अंतिम तारीख 16 सप्टेबर 2024 ही आहे. जवाहर नवोदय विदयालय हे केन्द्र शासनामार्फत चालविण्यात येणारे संपूर्ण निवासी विद्यालय आहे. या विद्यालयात केन्द्रीय माध्यमिक बोर्डाचे शिक्षण देण्यात येते. प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करतांना विद्यार्थी सलग तिसरी ते पाचवी मध्ये शिकलेला असावा. तसेच विद्यार्थी व पालक दोन्ही हिंगोली जिल्ह्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://navodaya.gov.in हे आहे. ही प्रवेश परीक्षा दि. 18 जानेवारी 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नियोजित परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालय वसमतचे प्राचार्य एस.जे. गवई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments: