21 August, 2024
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे उमरा येथे तालुकास्तरीय मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्टदरम्यान इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची सुरुवात दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे तालुकास्तरीय मेळाव्याने झाली आहे .
या उपक्रमाचा भाग म्हणून दि. 20 ऑगस्ट, 2024 रोजी कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेमध्ये तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते या होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, श्रीमती सुशिला पाईकराव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत वारंगा फाटा येथील वसंतराव नाईक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ब्रम्हानंद गिरी यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय मेळाव्याचे महत्त्व विशद केले.
यावेळी समाज कल्याण अधिकारी राजू एडके व उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक मनीष राजूलवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, वसंतराव नाईक महामंडळाचे ज्ञानेश्वर धुळे यांनी वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. अनिल फुले यांनी ओबीसी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली.
या मेळाव्याची सुरुवात महामानवांच्या प्रतिमा आणि वसुंधरा पूजनाने करण्यात आली. तसेच वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील कु.संजीवनी राठोड, कु. राजश्री राठोड, कु. भूमिका पवार, कु. अनुष्का कदम या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू पवार व श्रीकांत पतंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळू पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरीक्षक मनिष राजूलवार, वरिष्ठ लिपिक श्री.वाकळे, ग्रंथपाल बाळू पवार, रविकुमार बोक्से तसेच उगम ग्रामीण विकास संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment