20 August, 2024
महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध, शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 12 ऑगस्ट ते दि.7 सप्टेंबर, 2024 पर्यंत महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
यात हिंगोली जिल्ह्यातील 251 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वरील कालावधीत संबंधित 251 शेतकरी बांधवानी आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली यानी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment