07 August, 2024
१५० गावात ड्रोनव्दारे सर्व्हे पूर्ण - चार गावामध्ये १० ऑगस्टला पीआर कार्ड व सनदचे वाटप
१५० गावात ड्रोनव्दारे सर्व्हे पूर्ण
- चार गावामध्ये १० ऑगस्टला पीआर कार्ड व सनदचे वाटप
हिंगोली, दि.७ (जिमाका) : स्वामित्व योजनेंतर्गत हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १५० गावांचा ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त शनिवार, (दि. १०) रोजी हिंगोली तालुक्यातील चार गावामध्ये पीआर कार्ड व सनद वाटप केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या परीपत्रकान्वये स्वामित्व योजनेंतर्गत प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, भूमिअभिलेख जिल्हा अधिक्षक प्रशांत बिलोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका भूमिअभिलेख उपाधीक्षक राम सिद्धमवार यांच्या पथकाने हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १५० गावांचे अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ३४ गावांची चौकशी पूर्ण झाली असून १० गावांचे पीआर व सनद तयार झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १० ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील जोडतळा, देऊळगाव रामा, दुर्गधामणी आणि आंबाळा या ठिकाणी गावठाणातील मिळकतीचे पीआर कार्ड व सनद वाटप केली जाणार आहेत. यासाठी जोडतळा येथे सी.जी. मदिलवार, हितेश राऊत, ए. एन. गोरे, देऊळगाव रामा येथे मो.अलिमोद्दीन, ए. के. पठाण, यु. एम. राऊत, दुर्गधामणी येथे बी. एन. जगताप, जी. एस. किरगे, एस. बी. ठाकरे, आंबाळा येथे ए. आर. तमखाने, एस. एस. घुगे, एस. एस. उगले या कर्मचार्यां ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या चार गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ८ वाजता उपस्थित राहून आपले पीआर कार्ड व सनद घ्यावी, असे आवाहन तालुका भूमिअभिलेख अधीक्षक राम
सिद्धमवार यांनी केले आहे.
ड्रोन सर्वेक्षणामुळे होणारे फायदे
अत्याधुनिक ड्रोनद्वारे मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात आल्याने आता गावठाणातील सर्व मालमत्ताची अत्याधुनिक झालेल्या सर्वेक्षणामुळे प्रत्येक घराचा नकाशा, सिमा व क्षेत्राची माहिती मिळणार आहे. हा मालमत्तेचा अधिकृत पुरावा, मिळकत पत्रिका स्वरूपात मिळणार आहे. कर्ज उपलब्धता, विविध आवास योजनेत मंजुरी जागेचे मालकी हक्क, तंटे, वाद कमी उद्भवतील, जमिनीची खरेदी-विक्री, व्यवहारातील फसवणूक या बाबीपासून मोठी मदत मिळणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment