14 August, 2024
नशा मुक्त भारत अभियानानिमित्त संकल्प
हिंगोली, दि.14 (जिमाका): केंद्र शासनाच्या सामजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या अंतर्गत, मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्तीची नुकतीच शपथ घेण्यात आली.
नशामुक्त भारत अभियानाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील दिव्यांग विभागाच्या सभागृहात नशामुक्त भारत अभियान समितीच्या अंर्तगत, जिल्हा समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती संकल्प उपक्रम पार पडला.
नशामुक्त भारत अभियान समितीचे सदस्य विशाल आग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी व्यसनमुक्तीच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली. “विकसित भारताचे मंत्र, भारताचे नशेपासून स्वातंत्र्य” ही या वर्षाची संकल्पना नशामुक्त भारत अभियानाच्या वतीने सुनिश्चित करण्यात आली आहे. सभागृहात व्यसन मुक्तीचे चित्रप्रदर्शन देखील लावण्यात आले होते. कार्यक्रमास दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, शिक्षक-शिक्षिका, दिव्यांग विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment