27 August, 2024
अनुदानाच्या जलद वितरणासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा कार्यपध्दतीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 27 : अनुदानाच्या जलद वितरणासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) कार्यपध्दती लागू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे सहायक यांच्यासाठी आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकांत उबाळे, अपर कोषागार अधिकारी एम. जी. वानखेडे यांच्यासह विविध कार्यालयांचे आहरण व संवितरण अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कोषागार कार्यालयाचे लेखा लिपिक अविनाश भगत यांनी मकोनि-44 वरील देयकाद्वारे राज्याच्या एकत्रित निधीतून तपशीलवार शीर्ष 27-लहान बांधकामे, 31-सहायक अनुदान (वेतनेत्तर), 33-अर्थसहाय्य, 35-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान, 50-इतर खर्च, 53-मोठी बांधकामे आणि वित्त विभागाने वेळोवेळी घोषित करता येतील अशा अन्य उद्देश शीर्षाअंतर्गत आहरित केल्या जाणाऱ्या निधीकरिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) प्रणालीद्वारे अनुदानाच्या जलद वितरणासाठी रक्कम कोषागारातून आहरित करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अचूकता येण्यासाठी आभासी स्वियप्रपंजी लेखा कार्यपध्दतीचे स्थूल स्वरुप, प्रशासक घोषणा आणि नोंदणी, व्हीपीडीए खाती रक्कम जमा करणे, प्रणालीत अदात्याची नोंदणी, अदात्यांना प्रदान करणे, प्रणालीवरील लेखांकन, ताळमेळ, कोषागार कामकाज, प्रशासकाशी ताळमेळ आणि प्रणालीच्या लाभाविषयी सादरीकरणाद्वारे उपस्थित सर्व आहरण व संवितरण अधिकारी, त्यांचे सहायक यांना कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी एम.जी. फड यांनी आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) कार्यपध्दती अवलंबण्याबाबत प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, उम मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे यांचे जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment