03 August, 2024
महसूल पंधरवाडानिमित्त कृषी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे ५ ऑगस्ट रोजी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. ३ : कृषी विज्ञान केंद्र व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा निमित्त कृषी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार हे राहणार आहेत. तर अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख पी. पी. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम हे राहणार आहेत. तर मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, उद्यान विद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, पीक संरक्षण, कीटकशास्त्र विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, गृह विज्ञान विशेषज्ञ रोहिणी शिंदे, मृदाशास्त्र विशेषज्ञ साईनाथ खरात, कृषी विस्तार विशेषज्ञ डॉ.अतुल मुराई, पशुविज्ञान कार्यक्रम सहाय्यक डॉ.कैलास गीते हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment