01 August, 2024

महसूल पंधरवाड्यात राबविण्यात येणार विविध उपक्रम

हिंगोली (जिमाका), दि. 01 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महसूल पंधरवाड्यात तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले आहे. महसूल पंधरवाड्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामध्ये 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला कृषि मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल-जन संवाद, 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे. ******

No comments: