17 August, 2024

भावाकडून ‘लाडकी बहिणी’चे पैसे राखी पौर्णिमेपूर्वीच खात्यात !

• ‘आमच्या भावांनी ओवाळणी दिलीयं..’ लाडक्या बहिणींच्या भावना. • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाल्याने लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद हिंगोली,दि.१७(जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर बुधवार (दि.14) रोजी राखी पौर्णिमेपूर्वीच जमा झाले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी ‘आमच्या भावांनी ओवाळणी दिलीयं.. अशा भावना व्यक्त करत पात्र लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक लाभार्थी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंगोली तालुक्यातील मालवाडीच्या श्रीमती जयश्री वानखेडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांच्या आज मिळालेल्या तीन हजार रुपयांतून मी मुलांच्या शिक्षणासाठी पतीला आर्थिक हातभार लावणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथील शितल डोईफोडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तीन हजार रुपये खात्यावर जमा झाल्याचे सांगत या रकमेतून आर्थिक मदत होणार असल्याचे सांगत मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या योजनेतून तीन हजार रुपये मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. हिंगोली तालुक्यातील मालवाडीच्या रेखा गव्हाणे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचे मला तीन हजार रुपये मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. काहीही न करता माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते. हिंगोली शहरातील नसरीन शेख युनूस यांनी त्यांच्या खात्यावर 15 ऑगस्ट रोजीच तीन हजार रुपये जमा झाल्याचे सांगत कुटूंबासाठी लागणाऱ्या छोट्या –मोठ्या गरजा पूर्ण होणार असून, मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहे. हिंगोली येथील श्रीमती मिरा तायडे यांनी गत महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नावनोंदणी केली होती. या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून महिलांच्या लहान-सहान गरजा पूर्ण होणार आहेत. मला 15 ऑगस्ट रोजीच पैसे मिळाले असून, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांची आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील श्रीमती अनुराधा पद्माकर नायक या भगिनीच्या खात्यावर बुधवारी सायंकाळी त्यांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दोन हप्त्याचे 3 हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमदार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेमध्ये नावनोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. श्रीमती अनुराधा नायक यांच्यासह त्यांच्या सासूबाई आणि जाऊबाईंच्याही बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येकी 3 हजार रुपये जमा झाले आहेत. *****

No comments: