14 August, 2024

वाहनचालकांना जर्मनीत नोकरीची सुवर्णसंधी

हिंगोली, दि.14 (जिमाका): जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत 25 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार जर्मन भाषा अवगत असणाऱ्यांना जर्मनीमध्ये नोकरीसाठी जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, या प्रकल्पांअंतर्गत शासनाने दिलेला क्यूआर कोड इच्छुक वाहनचालकांनी स्कॅन करून किंवा http://www.maa.ac.in/GermanyEmployment या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या प्रकल्पाअंतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे, तथापि जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून संदर्भांकित शासन निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे. जर्मन व भारत या दोन्ही देशातील वाहनचालकांसाठी असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक बाबींमध्ये तफावत असून उमेदवारास 'आवश्यक प्रशिक्षण ( उदा. Left Hand Drive etc) देण्याबाबतची कार्यवाही व खर्च देखील शासन स्तरावरून होणार आहे. त्यामुळे जर्मनीस जाण्यास इच्छुक असणा-या वाहन चालकांनी या शासकीय उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: