20 August, 2024
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करावे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली.
यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक प्रतिज्ञा घेतली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment