03 August, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 3 : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर, धनराज निमजे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. *****

No comments: