21 August, 2024
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे तालुकास्तरीय मेळाव्याला सुरुवात
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची सुरुवात दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी झाली .
या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व स्वागत गिताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनावणे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, सामाजिक कार्यकर्ता विशाल इंगोले, आत्माराम बोधीकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी समाज कल्याण विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभाग वेगळा झालेला असून समाज कल्याण विभागाच्या धरतीवर इतर मागास बहुजन कल्याणतर्फे विविध योजना राबविल्या जातात त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्करार्थी विजय निलावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक बालाजी टेंभुर्णे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, वसंतराव नाईक महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पी. एम. झोंबाडे यांनी वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. श्री.अनिल फुले यांनी ओबीसी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली.
या कार्यक्रमात पीएसआयपदी निवड झालेल्या महेश आत्माराम बोथीकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू पवार तर आभार प्रदर्शन सुरेश पठाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो कार्यालयातील कर्मचारी निरीक्षक मनिष राजूलवार, निरीक्षक बालाजी टेंभुर्णे, वरिष्ठ लिपिक श्री.वाकळे, ग्रंथपाल बाळू पवार, श्रध्दा तडकसे, रविकुमार बोक्से, उखा मुरकुटे, जयदीप देशपांडे, पंचशील कुऱ्हाडे, प्रतिक सरनाईक व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment