30 August, 2024
केवळ संशयातून तलाठी पवार यांचा खून तहसीलदार शारदा दळवी यांची माहिती
हिंगोली (जिमाका),दि. ३० : वसमत तहसील कार्यालयातील आडगांव रंजे तलाठी सजाचे तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर दि.२८ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रताप जगन्नाथ कऱ्हाळेने तलाठी कार्यालयात जावून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संतोष देवराव पवार यांचा मृत्यू झाला आहे.
"प्रलंबित फेरफारमुळे तलाठी यांचा खून" अशा आशयाची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेली आहे. ही बाब अत्यंत चुकीची असून हल्लेखोर आरोपी यांचा जमिनीविषयक कोणताही फेरफार संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हता. केवळ संशयामुळे संबंधित तलाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला होवून त्यात मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment