01 September, 2024

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक व पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि. १ : आज हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीपिकाचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. काही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते. त्याच्या सुटकेची कार्यवाही बचाव पथकामार्फत करण्यात आली आहे. पावसामुळे शेतीपिकाचे तसेच पशुधनाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार उद्यापासून जिल्ह्यात तहसील स्तरावरील विविध पथकांमार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे. *****

No comments: