05 September, 2024

पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पूर्व सुचना देण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घ्यावी

हिंगोली, दि.05 (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2024 राबविण्यासाठी दि. 26 जुन 2023 अन्वये शासनाने मान्यता दिलेली असून हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 72 हजार 015 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. त्याअनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या पिक विमा काढलेल्या खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance हे अॅप https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central डाऊनलोड करुन त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Local Calamity) अंतर्गत व सध्या जिल्ह्यात मुग व उडीद पिकांची काढणी चालू असल्याचे दिसून येत आहे. अशा शेतकऱ्यांनी काढणी पश्चात (Cut and Spread) या बाबी अंतर्गत नुकसानग्रस्त पिकांच्या फोटोसह अपलोड करावी व सोयाबीन, कापुस, तुर व ज्वारी अशा शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे 14447 टोल फ्री क्रमांकांवर तक्रार नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सदरची तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार देणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झाले असल्याने Crop Insurance अॅपवर Type of Insurance मध्ये Excess Rainfall व Inudation हेच कारण नमुद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान सुचना, तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: