02 September, 2024

हिंगोली जिल्ह्यात बीसीजी लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात

*क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत प्रौढांना देणार बी.सी.जी. लस* हिंगोली(जिमाका) : क्षय रोगापासून बचाव होण्यासाठी बी.सी.जी. लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. बी.सी.जी. लस ही सर्वांत सुरक्षित आहे. त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. सद्यस्थितीमध्ये बऱ्याच देशात प्रौढामध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बी.सी.जी. लसींचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही आरोग्य विभागामार्फत उद्या दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रौढांना बीसीजी लस देण्यास सुरुवात होणार आहे. भारतामध्ये यापूर्वीच गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या लसीचा वापर प्रौढांमधील क्षयरोग प्रतिबंधासाठी करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठरावीक ग्रामीण जिल्ह्यामध्ये व महापालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रौढांना बी.सी.जी. लस या महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी प्रौढांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना प्रथमतः ही लस देण्यात येणार आहेत A) ABCG अडल्ट बीसीजी म्हणजे काय ? उत्तर: लहान मुलाप्रमाणे मोठ्या व्यक्तींना (१८ वर्षापेक्षा जास्त) लसीकरण टीबी होऊ नये म्हणून करावयाचे आहे B) लस कोणी घ्यावी वय १८ वर्ष पूर्ण असावे, तीन ते पाच वर्षापूर्वी टीबी असल्याचा इतिहास,जोखीमग्रस्त व्यक्ती, बॉडी माक्स इंडेक्स १८ पेक्षा कमी, वय ६० वर्ष व त्यापेक्षा जास्त असणारे व्यक्ती, धूम्रपान करणारे व्यक्ती यांनी लस घ्यावी. C) लस कुठे आणि केव्हा मिळेल हिंगोली जिल्ह्यांमध्ये ३ सप्टेंबर पासून प्रौढ बीसीजी शिबीर सुरू होणार आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये मायक्रो प्लॅन नुसार सेशन आयोजित करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लसीकरण करून आपला गाव तालुका व जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभाग हिंगोली यांनी केले आहे नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी बीसीजी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे सर्व नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून आपला गाव तालुका व जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे. ही लस घेण्यासाठी जे लाभार्थी संमती देतील त्यांनाच देण्यात येणार आहे. लस देण्याकरिता गावागावांत, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. ******

No comments: