23 September, 2024
पेंन्शन व स्पर्शसंबंधी असलेल्या सर्व अडचणींचे निरसन करण्यासाठी संभाजीनगर येथे शुक्रवारी मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता व सर्व वयोवृध्द सैनिकांसाठी 97आर्टीलरी ब्रिगेड येथील "सर्वत्रा ऑडीटोरीयम छावणी छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार (दि.२७) रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेंन्शन व स्पर्श संबंधी अडचणींचे निरसन करण्यासाठी पुणे येथील प्रधान नियंत्रक संरक्षण विभागाच्या लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यामध्ये प्रधान नियंत्रक संरक्षण विभागाच्या लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी पेंन्शन व स्पर्शसंबंधी असलेल्या शंका व अडचणींचे निरसन करणार आहेत. तसेच 'वन रँक वन पेन्शन" व अन्य शासकीय योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.
पेन्शन व स्पर्शसंबंधी अडचणी असल्यास त्यांनी या मेळाव्याला जाताना सर्व मूळ कागदपत्रे व अडचणीसंबंधी वैयक्तिक अर्ज हिंदी अथवा इंग्रजीमध्ये तीन प्रतीत सोबत असावेत. ज्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना लिहिण्या-वाचण्यासंबंधी अडचण असल्यास त्यांनी त्यांच्या कुटुंबातील योग्य व्यक्तीस सोबत घेवून जावे.
या मेळाव्यास जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांकरिता मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक व रेल्वेस्टेशन ते 97 आर्टीलरी ब्रिगेड “सर्वत्रा ऑडीटोरियम" छावणी छत्रपती संभाजीनगर पर्यंत सैनिक परिवाहनाची तसेच चहापान व दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्यास हिंगोली जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, वीर पिता, वीर माता व सर्व सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9404975099 वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असेही सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment