23 September, 2024

रेशीम उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली जिल्ह्यातील रेशीम उत्पादक लाभार्थ्यांचा शेतकरी अभ्यास दौरा रूई ता.गेवराई जि.बीड व जालना येथील रेशीम मार्केट व शेतीस भेट देण्यासाठी आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यास जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला. या दौऱ्या दरम्यान रूई ता.गेवराई जि.बीड येथील प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. तसेच जालना येथील रेशीम मार्केट व प्रगतशील शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे, गजानन काचगुंडे तसेच नितीन लोलगे, राजू रणवीर, रजनीश कुटे, कुलदीप हरसुले, केतन प्रधान, कु.राधा पाटील , रमेश भवर, तान्हाजी परघणे आदी शेतकरी उपस्थित होते. ******

No comments: