27 September, 2024
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 3 जलमित्राची होणार कुशल प्रशिक्षण द्वारे नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, मेकॅनिकल, फिटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर अशा तीन जलमित्राची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली आहे.
राज्य शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बहु कौशल्य मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित केलेल्या संख्यानुसार गवंडी, मेकॅनिकल, फिटर ईलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन ग्रामपंचायतीकडे कामाचा पूर्व अनुभव असलेला उमेदवार याला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने गवंडी-3, मेकॅनिकल-3, इलेक्ट्रिशन पंप ऑपरेटर-3 या प्रत्येक पदासाठी जल मित्राचे गुणवत्ता यादीनुसार दिलेल्या नमुन्यात पत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड ग्रामपंचायत समितीकडून पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार जलमित्राच्या तीन पदासाठी उमेदवार निवडला जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायत समितीशी संपर्क साधावा. तसेच सदरील जल मित्राचा अहवाल ग्रामपंचायतीने सर्व पंचायत समिती गट संसाधन केंद्र येथे दि.30 सप्टेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच पाणी पुरवठा योजनेच्या भविष्यातील देखभाल दुरुस्ती व शाश्वततेसाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक अर्ध कुशल मनुष्यबळ यांना कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment