20 September, 2024
हिंगोली जिल्ह्यातील सहा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील एक हजार महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वर्धा येथून ऑनलाईन पध्दतीने झाला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांतील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा समावेश आहे.
आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्राची कार्यक्रम आयोजित करून सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिनकरराव माने, दिलीप मस्के उपस्थित होते. तर जुनियर कॉलेज ऑफ एन्ट्रॉस ऑफ सायन्स ॲन्ड आर्ट्स येथे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, आशिष वाजपेई, राहूल मेने यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील हिंगोली येथील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, जुनियर कॉलेज ऑफ एन्ट्रॉस ऑफ सायन्स ॲन्ड आर्ट्स, वसमत येथील श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब पतंगे आर्ट्स कॉलेज, कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथील सरस्वती इन्टेलेट्यूट ऑफ फार्मसी, कळमनुरी येथील कै. देवरावजी कल्याणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या सहा महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला.
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment