24 September, 2024
शासकीय योजनेच्या लाभासाठी पैसे देऊ नका समाज कल्याण विभागाचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : मागील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून शिलाई मशीन, पिठाची गिरणी या योजनेचा लाभ देतो म्हणून काही भामटे, भोंदू व्यक्तीकडून फोन, मॅसेज पाठवून त्यांना ऑनलाईन पैसे टाकण्याची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा स्वरुपाच्या शासकीय योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करु नये.
तसेच आपणास कोणत्याही भामट्याचा फोन आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका व कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण स्वत: समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे येऊन विचारपूस करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment