03 September, 2024

इस्राईलमध्ये बांधकाम, नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी

हिंगोली, दि.03 (जिमाका): राज्य शासनाने राज्यातील कुशल बेरोजगार युवक-युवतींना इस्त्राईलमध्ये बांधकाम तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात लाखभर उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी आहे. याद्वारे युवकांना स्वप्नांची क्षितिजे विस्तारण्याची संधी मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रातील रोजगाराची संधी फ्रेमवर्क/शटरिंग कारपेंटिंग, लोखंड वाकवणे/बार बेन्डींग (शटरिंग काग), पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम) याविषयी कौशल्ययुक्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात रोजगाराची संधी वृद्धांची, आजारी व्यक्तींची काळजी व देखभाल घेणे, इंजेक्शन, ड्रेसिंग इ. वैद्यकीय कामाचे कौशल्य व तात्काळ उपचार करण्याबाबतचे कौशल्य असणाऱ्या युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांसाठी पात्रता इस्राईलमध्ये काम करण्याची इच्छा, उमेदवाराला जुजबी इंग्रजी विषयाचे ज्ञान, क्षेत्रासंबंधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र, किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट, किमान शिक्षण अट नाही, वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे, कोणताही प्रदीर्घ आजार नसावा. इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी राज्यातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येईल, या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास अंदाजित १ लाख ३७ रुपयापर्यंत मासिक वेतनाची संधी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट कालावधी किमान 3 वर्ष पुढील टप्प्यात यासह इतर क्षेत्रातील 1 लाख कौशल्यधारक व युवतींना केअर गिविंग, नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन १८००१२०८०४० येथे तात्काळ संपर्क साधावा. तसेच बांधकाम क्षेत्रातील इच्छूकांनी : https://tjy/FMYYR या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजाभाऊ कोल्हे यांनी केले आहे. *******

No comments: