10 September, 2024
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 10 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025 करिता केंद्र शासनाने दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
सदरचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. पोर्टल व्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादींनी अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारचया जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment