02 September, 2024

अतिवृष्टीमुळेझालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरु करावेत- जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हाधिकारीश्री. गोयल यांनी घेतला ऑनलाईन बैठकीद्वारे परिस्थितीचा आढावा

हिंगोली(जिमाका),दि.02: जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेती पिकाचे,पशुधन, घरे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचे मोठ्या प्रमाणातनुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करावेत, असे निर्देशजिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेआहेत. आज गुगलमीटद्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलतहोते. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपरजिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड,उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल, सर्व उपविभागीयअधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थितहोते. जिल्ह्यातकाही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले. त्या सर्वांना सुरक्षितस्थळीहलविण्यात आले असून, त्यांच्या अन्न-पाणी आणि निवाऱ्याची सोय करावी. पाऊस आणि पुराच्यापाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातीलशेती, घरे, व जनावरांचे तातडीने पंचनामे सुरु करावेत. या अतिवृष्टीमध्ये जीवित ववित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी. तसेच मदतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तातडीनेमदत पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच महावितरण विभागाने खंडीत झालेला वीज पुरवठासुरळीत करण्याची प्राधान्याने आणि तात्काळ कार्यवाही करावी. तसेच वीज उपकेंद्र,शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये पाणी शिरले आहे, त्याठिकाणचे पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्यानुकसानीचा आज पालकमंत्री अब्दुल सत्तार हे भेट देऊन पाहणी करणार आहेत. यामध्ये आडगाव,सावरखेडा, सोडेगाव, डोंगरगाव पूल येथे पाहणी करणार आहेत. तसेच त्यानंतर जिल्हाधिकारीकार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ******

No comments: