24 September, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी बँक खाते आधार लिंक करावे
हिंगोली (जिमाका), दि. 24 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजतेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
या योजनेसाठी दि. 1 जुलै, 2024 पासून अर्ज भरणे सुरु असून 30 सप्टेंबर, 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटीद्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते तात्काळ आधार लिंक करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment