05 September, 2024
जिल्हाधिकारी कार्यालयात संत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी
हिंगोली, दि.05 (जिमाका) : महान संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक संत चक्रधर स्वामी यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी संत चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्वामींना आदरांजली वाहिली.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment