25 September, 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर, मिलींद वाकळे, धनंजय निमजे, कुसूम भिसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. *******

No comments: