29 September, 2024
जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन
हिंगोली(जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्र भांडेगाव अंतर्गत उपकेंद्र भिरडा येथे सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये बाह्य रुग्ण तपासणी १८० इसीजी २२ व एनसीडी १६० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरास डॉ. तापडिया, डॉ. माधव मगर, डॉ. पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. गट्टू, समुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. अतुल पुरी, आरोग्य सेविका मोरे, आरोग्य सेवक सुरसे, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व दिनकर नेतने, किशोर बांगर, संदीप मस्के, गंगाधर मुदनर व आशाताई जाधव, अंगणवाडी सेविका व मदतनीस, इतर ग्रामस्थ मंडळी या सामुदायिक आरोग्य शिबिरास उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment