06 September, 2024
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सोमवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि. ०६ : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे सोमवार दि. ०९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे सोमवार, दि. ९ सप्टेंबर, २०२४ रोजी नांदेड येथून मोटारीने दुपारी १२.३० वाजता वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण व वसमत तालुक्यातील कुरुंदा व माळवटा या गावांमधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतील. दुपारी १ वाजता वसमत उपविभागीय कार्यालयात आगमन करून हिंगोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता वसमत उपविभागीय कार्यालय येथून पूर्णा जिल्हा परभणीकडे प्रयाण.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment