05 September, 2024

शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष आज्ञावलीमध्ये नोंदविण्याचे आवाहन

हिंगोली, दि.05 (जिमाका) : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2024 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दि. 01 जुलै, 2024 या संदर्भ दिनांकास अनुसरुन माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे बंधनकारक आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahades.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या कार्यालयाच्या माहिती अद्ययावत करावयाची आहे. ही माहिती ऑनलाईन आज्ञावलीत नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली यांचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर, 2024 (नोव्हेंबर पेड इन डिसंबर, 2024) ची वेतन देयके कोषागार कार्यालयामार्फत स्वीकारण्यात येणार नाहीत, याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड यांनी केले आहे. ******

No comments: