05 September, 2024

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पथके स्थापन करुन तात्काळ पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, दि.05 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, जनावरे, घरांचे झालेले नुकसान व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसानीचे पथक स्थापन करून तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन व्हीसीमध्ये सर्व संबंधिताना दिल्या. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दि. 04 सप्टेंबर, 2024 रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने व्हीसी द्वारे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शेत जमीनीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांना सर्व तालुक्यातील बाधित नागरिकांना धान्य पुरविण्याच्या अनुषंगाने सुचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसानीचे अहवाल सादर करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद हिंगोली, पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद, नगर पंचायत व महावितरण विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड व अमरावती, आरोग्य विभाग यांना सुचित करण्यात आले. दि. 01 व 02 संप्टेबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे बाधित झालेल्या गांवाची संख्या 549 असून जखमी व्यक्तींची संख्या 01 आहे. मयत व्यक्तीची संख्या 02 असून त्यापैकी 01 व्यक्तीच्या वारसास मदत वितरीत करण्यात आली आहे. अंशतः पडझडीमुळे नुकसान झालेल्या घरांची संख्या प्राथमिक अहवालानुसार 632 एवढी आहे. तसेच शेतीपिक नुकसानीचे बाधित क्षेत्राचे सविस्तर पंचनामे करण्याची कार्यवाही सर्व त्तालुक्यांच्या ठिकाणी प्रगतीपथावर असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. *******

No comments: