06 September, 2024
घोडा, बेलथर येथे बाल कायद्याची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार मौजे घोडा व बेलथर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त बाल कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात बालकांचे हक्क, अधिकार, बालकांसाठी असणारी कायदे व यंत्रणा याविषयी माहिती देण्यात आली. काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके, विधी संघर्षग्रस्त बालके बालविवाह कायदा 2006 नुसार विद्यार्थ्यांना बालविवाह म्हणजे काय ? होण्याचे अनेक कारणे, तो केल्यास कायद्याने गुन्हा नोंदविला जातो. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यानी दिली.
बालधोरण, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, त्यामध्ये असणारी कलमाविषयी माहिती दिली. ग्रामपंचायत बेलथर येथे उपस्थित गाव बाल संरक्षण समिती, ग्राम विकास अधिकारी व गावकरी यांना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना व जिल्हास्तरावर स्थापन असलेली समिती प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व समितीचे कार्य व योजनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व लोकापर्यंत योजना पोहोचावी, या उद्देशातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आपल्या सभोवताली कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. वरील यंत्रणा बालकांकरिता तात्काळ मदत करणारी आहे,अशी माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब खान पठाण यांनी दिली.
या कार्यक्रमात मौजे घोडा येथील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. तसेच मोजे बेलथर येथील शाळेतील विद्यार्थी शिक्षक व ग्रामपंचायत सरपंच व इतर सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी बालविवाह निर्मूलन प्रतिज्ञा घेतली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment