24 September, 2024

लॅपटॉप खरेदीच्या अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी तालुकास्तरावरुन प्राप्त झालेल्या अर्जामधून अंतिम पात्र ठरलेल्या 123 लाभार्थ्यांच्या निवडीस जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या निवड समितीन मान्यता दिली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यांदी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सर्व प्रथम लॅपटॉप खरेदी करुन खरेदीच्या जीएसटी पावतीसह अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम 30 हजार रुपये लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड यादीतील लाभार्थ्यांनी सर्वप्रथम स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी करुन अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे. *****

No comments: